नांदेड :(दि.2 मार्च )
 रमेश गंगासागरे
       दीपावली पासून महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचारी आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी तसेच एसटीचे विलीनीकरण करण्यासंदर्भात संपावर गेले असल्याने एसटी ची चाके थांबलेलीच आहेत त्यामुळे एसटी तोट्यात जात असल्याचे पाहून एसटी महामंडळाने कंत्राटी कर्मचारी चालक यांच्या हातामध्ये एसटीचे स्टेरिंग दिले आहे, पण चालक हे अप्रशिक्षित असल्यामुळे एसटीचे राज्यभरात अनेक अपघात झाल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यामुळे एसटी मध्ये बसण्यासाठी कोणताच नागरिक हिंमत करत नसल्याचे चित्र आता पुढे आले आहे.
       एस टी चे कर्मचारी हे कधी नव्हे ती हिंमत दाखवली असून ते एकजूट होऊन मोठ्या निकराचा लढा देत आहे आज जवळपास पाच महिन्यापासून आपल्या मागणीवर ठाम असून एकाही कर्मचाऱ्याने एसटीचे स्टेरिंग हातात धरले नाही, त्यामुळे नाईलाजाने महामंडळाला कंत्राटी कामगारांच्या हातात एसटी बसचे स्टेरिंग द्यावे लागले आहे, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी एसटीचे अपघात झाल्याच्या बातम्या वाचावयास मिळत आहेत. अशा प्रकारच्या बातम्या वाचून नागरिक जीव धोक्यात घालून एसटी बस मध्ये बसण्यासाठी तयार होत नाहीत, त्यामुळे एसटी अधिकच तोट्यात जात असल्याचे पहावयास मिळत आहे. एसटीचे विलीनीकरण करण्यासंदर्भात हा खटला आता न्यायालयापर्यंत गेला असून एसटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य न्यायालयावर अवलंबून आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघत बसल्या पलीकडे कोणताच मार्ग नसल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसंदर्भात आता सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची वेळ आली असल्याचे अनेक एसटी कर्मचारी बांधव बोलून दाखवत आहेत. तर अनेक कर्मचाऱ्यांनी ना घर मालक घर सोडून जाण्यासाठी तगादा लावत असल्याचे कर्मचारी बोलत आहेत.