सेवा समर्पण पुरस्काराचे मानकरी सौ.अमृतवाड व श्री,होळगे.
भोकर (दि.8 मार्च )
रमेश गंगासागरे
■ वर्धापन दिनानिमित्त नेत्ररोग व भव्य रक्तदान शिबीर
येथील सेवा समर्पण परिवाराच्या वतीने समर्पित भावनेने काम करणाऱ्या दोन व्यक्तींना मराठवाडास्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. यातील ग्रामसेवा समर्पण पुरस्कार हाडोळीच्या सरपंच श्रीमती अनिता माधवराव आमृतवाड तर कृषी सेवा समर्पण पुरस्कार लोहा तालुक्यातील दापशेड येथील नैसर्गीक शेती करणाऱ्या विश्वनाथ गोविंदराव होळगे यांना देण्यात येणार असल्याची माहिती सेवा समर्पण परिवारचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी दिली. मागील तीन वर्षापासुन सेवा समर्पण परिवार सेवाभावी वृत्तीने काम करत आहे, सेवा समर्पण परिवाराच्या तिसऱ्या वर्धापण दिनानिमीत्ता दि. 26 मार्च रोजी हाडोळी येथे नेत्ररोग शिबीर तर दि. 27 मार्च ला भोकर येथील तहसिल कार्यालयात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. सेवा समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीला या वर्षीपासुन मराठवाडा स्तरीय पुरस्कार देण्यात येत आहे. स्मार्ट व्हिलेज म्हणुन नाव लौकीकास आलेल्या हाडोळी गावचे सरपंच श्रीमती अनिता माधवराव आमृतवाड यांना ग्रामसेवा समर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे, तर 2014 पासुन अत्यंत प्रतिकुल परिस्थीत नैसर्गीक शेती करणारे विश्वनाथ गोविंदराव होळगे रा. दापशेड ता. लोहा यांनी कृषी सेवा समर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप रोख 11 हजार रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे राहणार आहे. सदरील पुरस्काराचे वितरण सेवा समपर्णाच्या वर्धापन दिनानिमीत्त दि. 29 मार्च 2022 रोजी कैलास गड, भोकर येथे पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी भास्कर पेरे पाटील यांचे ग्रामसुधारणा बाबत व्याख्यान होणार आहे.
0 Comments