रमेश गंगासागरे
एका वर्षाच्या दीर्घ कालखंडानंतर पुन्हा एकदा बुलेट चालक शहरातील विविध रोडवर सुतळी बॉम्ब सारखे कर्णकर्कश आवाज काढत सुसाट वेगाने गाडी पळवून नागरिकांना ध्वनिप्रदूषण करून उरात धडकी भरायला लावत असल्याने महिला व नागरिक हैराण झाले आहेत.
मागील वर्षी भोकर शहरात अश्याच प्रकारे बुलेट चालक शहरातील रोडवर आपला किळसवाणा शौक पूर्ण करण्यासाठी वाहतूक नियमांचा भंग करून अचानक जोराने गाडी चालवून नागरिकांच्या जवळ येताच सुतळी बॉम्ब सारखे मोठे आवाज बुलेट गाडी मधून काढत होते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या, या तक्रारींची दखल घेऊन भोकरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री विकस पाटील यांनी अशा प्रकारचे मोठे आवाज करणाऱ्या 20 ते 25 बुलेट चालकांना पकडून त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई केली होती, त्यामुळे एका वर्षापासून अश्या टूकार तरुणांच्या बुलेटला चाप बसला होता, व ते शांतझाले होते, आता पुन्हा एकदा 1 वर्षाच्या कालखंडा नंतर काही टूकार तरुण बुलेट गाडीचे सायलेन्सर मध्ये बदल करून नागरिकांना त्रास देत असल्याचे भोकर शहरामध्ये दिसून येत आहेत, त्यामुळे अशा तरुणावर आणि बुलेटवर दंडात्मक कार्यवाही करून बुलेट गाडी जप्तीची कार्यवाही केली जावी, या आशयाची मागणी वाढली आहे.
0 Comments