भोकर :(दि.8 मार्च )
 रमेश गंगासागरे

भोकर येथील लहुजी चौकात असलेल्या अंगणवाडीत आज मंगळवार  दि.8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अनेक कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून बहुसंख्य अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस महिलांच्या उपस्थित जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
       सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्चना शेट्टे सुपरवायझर नांदेड, प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट सौ. राठोड, डॉक्टर सौ.नारलावार, ज्येष्ठ विधी तज्ञ शिवाजी कदम, दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश वाघमारे आणि भोकर न्युज लाईव्हचे संपादक रमेश जी गंगासागरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम कार्यक्रमात सावित्रीबाई फुले आणि माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले, त्यानंतर  उपस्थित कर्तुत्वान महिला डॉक्टर वकील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला, तसेच उपस्थित पाहुण्यांचे ही यावेळी पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले, यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका सौ कुलकर्णी मॅडम यांनी केले,  कार्यक्रमात डॉक्टर सौ. नारलावार, ॲडव्होकेट सौ. राठोड, ऍड.शिवाजी कदम, संपादक रमेश जी. गंगासागरे आणि पत्रकार राजेश वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त केले, अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका चंदरे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास असंख्य अंगणवाडी सेविका,महिला व मदतनीस उपस्थित होत्या.