भोकर :(दि.7 मार्च )
रमेश गंगासागरे
       सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या विविध योजनेची माहिती भोकर तालुक्यातील हळदा येथील सुप्रसिद्ध शाहीर रमेश नार्लेवाड आणि संच यांनी भोकर तहसील जवळ संगीतमय कार्यक्रम करून असंख्य नागरिकांना दिली.
       सोमवारी संध्याकाळी 4 ते 5 या वेळात तहसील जवळ शाहीर रमेश नार्लेवाड आपल्या साहित्यासह संगीतमय कार्यक्रम सादर करून शासनाच्या विविध योजनांची माहिती शाहिरीच्या माध्यमातून दिली यात, रमाई आवास योजना, चर्मकार बांधवांना गटई स्टोल योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, कन्यादान योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, यांच्यासह अनेक योजनांची माहिती आपल्या तासाभराच्या कार्यक्रमात दिली. या कार्यक्रमास शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.