भोकर :(दि.5 मार्च )
रमेश गंगासागरे
भोकर पासून जवळच असलेल्या मौजे नागापूर येथील शेतकरी नामे राजू ग्यानोबा पूजरवाड वय 35 वर्षे यांनी शेतात होत असलेली सततची नापिकी आणि कर्जास कंटाळून स्वतःच्या शेतामध्ये जाऊन आज दिनांक 5 मार्च रोजी दुपारी अंदाजे 3 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली, त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी, पत्नी आणि आई वडील असा मोठा परिवार आहे.
शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे समजताच भोकर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला असून प्रेत उत्तरीय तपासणी करण्यासाठी भोकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविले आहे.
राजू ग्यानोबा पूजरवाड हे नागापूर ग्रामपंचायत चे सदस्य म्हणूनही काही काळ नागरिकांची सेवा केली आहे. त्यांच्या अशा अचानक निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला असून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे नागापूर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments