भोकर :(दि 4 फेब्रुवारी )
  
  संपादकीय
रमेश गंगासागरे
भोकर तालुक्यातील रायखोड या गावात फेरफटका मारला असता, पिण्याच्या पान्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे, येथिल नागरिकांना मागील 20 वर्षांपासून घरपोच नळाचे पाणी मिळत नसल्यामुळे पाण्यासाठी वेदनादायक प्रवास चालू असून नागरिकांना अश्या पद्धतीने ( रायखोड येथिल चित्रात दाखविल्या प्रमाणे) स्वखर्चाने पाईपलाईन करून पाणी मिळवावे लागत आहे.
        रायखोड या गावास आतापर्यंत पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पद लाभले आहे, तर येथिल एखादा तरी नागरिक भोकर पंचायत समितीचा सदस्य असतोच, गावची लोकसंख्या जवळपास अडीच हजार आहे, इथे 3 मतदान केंद्रे आहेत. अन सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गावाच्या उशाला मोठा ओहोळ आहे, या ओहोळातुन वर्षातील 6 ते 8 महिने पाणी वाहत असते, असे असून येथील लोकप्रतिनिधीनी आजपर्यंत गावाच्या पाण्यासाठी काय  केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज पर्यंत गावात मोठी पाण्याची टाकी बांधण्यात आली नाही, जर पाण्याची टाकी बांधण्यात आली असती तर, गावचे चित्र निश्चितच आज वेगळे असते. तसे नसल्याने नागरिकांना  कधी लाईटच्या खांबावरून तर कधी ईतर  नागरिकांच्या घरावरून जीवघेणी कसरत करून दूरवरून विकतचे पाणी घरापर्यंत आणावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पाण्याचा खाजगी व्यवसाय जोमात चालत आहे. गावात 7 ते 8 नागरिकांकडेच विंधनविहिरी आहेत, काहीजण स्वतःसाठी वापरात आहेत, तर काही जण व्यवसायासाठी, गावामध्ये पाण्याचा दुष्काळ नाही, हे तेवढेच सत्य आहे, पण पाण्याचा योग्य वापर प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना करता येत नाही, ही बाब तेवढीच सत्य आहे. येथील ग्रामपंचायत ने
जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी मुख्य रस्त्यालगत मोठा हौद बांधला आहे, हौद नेहमीच फुल भरलेला असतो, या हौदावर अनेक जनावरे आपली तहान भागवतांना दिसतात, तसेच याच हौदावरुन अनेकजण पाणी नेतानाही दिसतात, सदरील विंधनविहिरीला भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, टाकी बांधून या पाण्याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पाणी जाईल, यात शँका नाही.