भोकर :(दि.3 मार्च )
रमेश गंगासागरे
        पंचायत समिती भोकरचे जुने गटशिक्षणाधिकारी .डी. एस. मठपती यांची पदोन्नती सहाय्यक संचालक म्हणून लातूर येथे झाली असल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी शैक्षणिक व प्रशासकीय  कार्यभार चालवण्यासाठी प्रशासनाचा मोठा
अनुभव असणारे शिक्षण विस्तार अधिकारी एम.जी. वाघमारे यांची नुकतीच गटशिक्षणाधिकारी पदाचे आदेश काढून त्यांना पदभार देण्यात आला. ते भोकर प.स मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून 2014 पासून कार्यरत आहेत. त्यांना शिक्षण क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. एम.जी.वाघमारे यांना तालुक्यातील शैक्षणिक धुरा सांभाळण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ, वर्षाताई ठाकूर /घुगे मॕडम, सभापती मा.बाळासाहेब पाटील रावणगावकर , शिक्षण सभापती संजय बेळगे ,शिक्षणाधिकारी सौ .सविता बिरगे ,पंचायत समिती भोकर च्या सभापती सौ निता व्यंकटेश राऊलोड ,.गटविकास अधिकारी मा.अविनाश राठोड यांनी प्रशासकीय व शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या व प्रशासन चालविण्याचा अधिकार दिला. मा.एम.जी.वाघमारे यांनी भोकर तालुक्यातील ,शिक्षक ,विद्यार्थी समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे आपल्या मनोगतातुन सांगितले आहे. त्यांचा तालुक्यातील शिक्षक मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख ,शिक्षण विस्तार अधिकारी यांनी नुकताच सत्कार करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या  आहेत. यावेळी शाहू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश जाधव सर, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे ,ग.शि.अ. भोकरचे वरिष्ठलिपिक शेख महमद नवाज सर कनिष्ठ लिपिक शेख इलियास  प.स.भोकर ,देवठाणा केंदाचे केंद्रप्रमुख लक्ष्मणराव सुरकार सर,केंद्रिय मुख्याध्यापक विश्वाबर संकमवाड सर,पुरोगामी शिक्षक संघटनेचे भोकर तालुका कोषाध्यक्ष राजकुमार नामपल्ले सर,कांडलीचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक पी.जी. गामोड सर,थेरबनचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक वट्टमवार सर, पाकीतांडयाचे मुख्याध्यापक हणमंत काऊलवार सर, कासारतांडयाचे गजानन तेलंग ,बाबानगरचे सह शिक्षक किरणकुमार पाटील सर,शिक्षक सुधीर अंबेकर सर,पुंडलिक बिरगाळे सर, मारोती बंडे सर, गौतम पोहरे सर,सौ.जयश्री बोरलेपवार मॕडम ,सौ.सुमन गबाळे मॕडम ,सौ.आशा कांबळे मॕडम ,सौ.अल्पना हत्ते मॕडम आदींच्या उपस्थितीत घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक बाबुराव माडगे यांनी मांडले तर सुत्रसंचलन हणमंत काऊलवार यांनी केले तर आभार गजानन तेलंग यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम पोहरे  ,राजकुमार नामपल्ले ,सुमन गबाळे अल्पना हत्ते यांनी मेहनत घेतली.