भोकर :(दि.29 मार्च )
    रमेश गंगासागरे
     शहरात झाडलेला घन कचरा नागरीक रहात असलेल्या ठिकाना जवळ भोकर नगरपरिषद आणून टाकत असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे येथील नागरिकांच्या वतीने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आला असून निवेदनाच्या प्रती तहसीलदार,पोलीस निरीक्षक भोकर त्यांना देण्यात आल्या आहेत.
       मागील एका वर्षापासून हनुमान नगर किनवट रोड येथील नागरिकांच्या नागरी वस्ती जवळ मृत जनावरे, झाडलेला कचरा, कुजलेला कचरा, भोकर नगरपरिषद आणून टाकत असल्यामुळे दुर्गंधी सुटून डास, माश्या चे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे निवेदन देऊन आंदोलन करण्यात येत होते, तरीसद्धा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याबाबत काहीच पावले उचलत नसल्याचे पाहून आता शिवसेनेचे महानगरप्रमुख पांडुरंग वर्षेवार माजी तालुका प्रमुख माधव पाटील वडगावकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आकाश गेंटेवार यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला असून सदरील ठिकाणी अवैधरित्या बनवण्यात आलेले डंपिंग ग्राउंड तात्काळ ईतर ठिकाणी हलविण्यात यावे अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा  संबंधितांना देण्यात आला असून निवेदनावर पांडुरंग वर्षेंवार, माधव पाटील वडगावकर, आकाश गेंटेवार, सिताराम मेटकर, यांच्यासह शेकडो नागरिक व महिलांच्या सह्या आहेत.