भोकर :(दि.26 मार्च )
रमेश गंगासागरे
भोकर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर नांदेड रोडवर नारवाट जवळ असलेल्या गुडा महादेव मंदिर परिसराच्या विस्तीर्ण पटांगणावर उभारण्यात आलेला भव्य बगीचा भोकर तालुक्यातीलच काय पण नांदेड जिल्ह्यातील असंख्य नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री, अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी भव्य मंदिर परिसरात, हिरवागार गालिचा, उभारण्यात आला आहे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी झुले, पाळणे, यांच्यासह ट्रेकिंग स्टेज, सिंगल बार, विविध प्रकारच्या लोखंडी आणि फायबर घसरगुंडी, व्यायामाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत, हीरव्यागार गालीचावर अनवाणी पायाने चालण्याचा आनंद कुछ और है, या ठिकाणी विदेशी नरम गवताचा वापर केल्यामुळे त्यावर बसून निवांत डब्बे खाणारे पर्यटक पाहून मन आनंदून जाते, शनिवारी, रविवारी या ठिकाणी दूरवरून शालेय विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत असतात, त्यामुळे हा परिसर गजबजून जात आहे. याच ठिकाणी अनेक दुर्मिळ औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि वाईल्ड लाईफ प्राणी यांचे पुतळे पहावयास मिळतात, दुर्मिळ झाडांची नावे त्यांचा उपयोग यांची इत्यंभूत माहितीचे फलक लावण्यात आले असल्याने अनेकांना त्या झाडांची ओळख चूटकीसरशी होण्यास मदत होते.आजुबाजूला हिरव्यागार वनराईने नटलेला परिसर पाहुन पर्यटक मोहून जात आहेत, मंदिराच्या समोरच भव्य सतीचा तलाव असल्याने, येथील सौंदर्यात अधिकची भर पडत आहे. सोमवारी महादेवाचे दर्शन करण्यासाठी आवर्जून अनेक भाविक भक्तिभावाने पूजाअर्चा करन्यासाठी गर्दी करत आहेत. 3 वर्षपूर्वी हा परिसर ओसाड असा होता, तेंव्हा कोणीच तिकडे भटकत नव्हते, आता निसर्ग पर्यटन केंद्र झाल्यामुळे भोकरची मान जिल्ह्याभरात उंचावत आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची गर्दी मावत नाही हे खरे.
0 Comments