स्मृतीशेष तुळशीराम कदम यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त धम्मदेसना व सांस्कृतिक प्रबोधनपर आंबेडकरी जलसा
मुदखेड:(दि25 मार्च )
रमेश गंगासागरे
मुदखेड येथून जवळच असलेल्या 'स्मृतिगंध' परिसरात आज २५ मार्च रोजी शुक्रवारी सकाळी भिक्खू संघाच्या उपस्थितीत परित्राण पाठ आणि धम्मदेसना तसेच सांस्कृतिक प्रबोधनपर आंबेडकरी जलसा पार पडला.
ज्येष्ठ नागरिक स्मृतीशेष तुळशीराम जळबाजी कदम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सकाळी ९.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भिक्खु विनय बोधी प्रिय महाथेरो यांनी यावेळी धम्मदेसना दिली. स्मृतीशेष तुळशीराम जळबाजी कदम यांच्या स्मृतीदिना प्रित्यर्थ दुपारी १ वाजता अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक डी. एस. टोम्पे, माजी सरकारी वकील तथा जिल्हा सत्र न्यायालयाचे विधिज्ञ प्रकाश टोम्पे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी एन. सरोदे, बुध्द तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आणि होमिओपॅथी तज्ञ डॉ. सिद्धार्थ जोंधळे तसेच सुप्रसिद्ध व्याख्याते आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुलातील प्रो. डॉ. राजेंद्र गोणारकर यांची यावेळी उपस्थिती लाभली होती. स्मृती दिनाच्या औचित्याने दुपारी सांस्कृतिक प्रबोधनपर आंबेडकरी जलसा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुप्रसिद्ध गायक प्रकाश वाघमारे आष्टीकर, भिमशाहीर अरुण कदम उमरीकर, ज्येष्ठ कवी गायक मोहन नौबते (नांदेड), शंकर चौदंते (मुदखेड), चांदू अवसरे (पार्डी वैजनाथ), विजय पवार आणि संगीता पवार (खुजडा
मुदखेड), शंकर गायकवाड (भोसी), राहूल बाघमारे (तेलंगणा), मधुकर हणमंते (नांदेड), सुभाष भिसे (जवळा पाठक), मीनाक्षी वाघोळे (पिंपळगाव कोरका) आणि विकास राजा गायकवाड (सिडको) आदी नामवंत गायक सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूज्य मातोश्री स्मृतीशेष सिताबाई तुळशीराम कदम प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष तथा मंत्रालयातील कृषी पशुसंवर्धन विभागातील अवर सचिव विकास कदम, सचिव प्राचार्य डॉ. विकास कदम यांनी प्रयत्न केले आहे.
0 Comments