भोकर :(दि.22 मार्च )
शेख इरफान शेख मुक्तार अहेमद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या ऍटोमध्ये प्रवाशी घेवून बेलतरोडा कडे जात असतांना भोकर म्हैसा रस्त्यावरील पिंपळढव पुलाजवळ एका दुचाकीवर तीन दरोडेखोर आले आणि त्यांनी ऍटो थांबवून  प्रवाशांना धक्काबुक्की करून त्यांच्याजवळी दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा 9 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.