उमरी : (दि.18 मार्च )
      गंगाधर सवई 
नायगाव, धर्माबाद, उमरी मतदार संघातील, नादेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तरुणांचे ह्र्दयस्थान मा.कैलासभाऊ गोरठेकर यांच्या वाढदीवसा निमित्त उमरी शहरात विविध उपक्रम धेऊन साजरा करण्यात आला.                      
       विविध गल्लीत व ठीक ठिकाणी केक कापून युवक व नागरिकांच्या वतीने फेटे बांधून शाल व पुष्पहार घालून फटक्यांची आतिषबाजी करून वाढदीवस साजरा करण्यात आला, न भुतो न भविष्यती, असा हा वाढदिवस उमरी शहरातील गल्लीबोळात पहावयास मिळाला.
       दि,१६ तारखेला सकाळी ०५, वाजता गोरठा नगरीमध्ये संत दासगणू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन, उमरी शहरातील साईबाबा मदीर, राम मदीर, बाबा महाराज मदीर, महादेव मंदिर याचे दर्शन घेऊन रापतवार नगरात सर्व प्रथम केक कापून व फेटा बांधून फुष्पहार घालून वाढदिवस साजरा करण्यात आला, तसेच जि.प.प्रा.शाळा, माता महाकाली मदीर परिसर, बंटी येरावार यांच्या निवासस्थानी, संदीप चंदनवार मेडिकल, येथे पाणपोईचे उद्धधाटन, रामधन पेट्रोल पंपावर  सत्कार करण्यात आला, अमित पटकुटवार यांच्या निवासस्थानी पाणपोई चे उद्धधाटन करण्यात आले, गिरीशभाऊ गोरठेकर सांस्कृतिक सभागृहात क्रिकेट सामण्याचे बक्षीस वितरण करण्यात आले. योगेश्वर प्रिंटिंग प्रेस येथे केक कापून सत्कार करण्यात आला. तसेच टायगर ग्रुपच्या वतीने गरजुना चादर वाटप कैलासभाऊच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर मोंढा मैदान येथे कैलासभाऊ गोरठेकर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोफत नेत्र तपासणी व चष्म्याचे वाटप करण्यात कार्यक्रम करण्यात आला, तसेच प्रत्येकाला श्रमकार्ड फ्री मध्ये दोनशे साठ लोकांना देण्याचे काम यांनी केले, यावेळी अभिष्टचिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राम पा.बन्नळीकर, विनायकराव कुळकर्णी, सदाशिवदादा पुपलवाड, प्रविणभाऊ सारडा, विष्णु पंडीत, श्रीनिवासन अनंतवार, गजानन लकडेवाड, अशोक मामीडवार, पांडुरंग गोरठेकर, धीरजकुमार दर्डा, मुगल तळेगावकर, डॉ. विक्रम देशमुख, पारसमल दर्डा, विष्णु अटल, आनंदराव यलमगोडे, गंगाधर सवई , राजु पाटील, ज्ञानेश्वर पा,कदम यांच्यासह असंख्ये कार्यक्रते उपस्थित होते.                                  
      या वाढदिवसामुळे उमरी शहरात तरूनामध्ये नवचैत्यन्य दीसुन आले होते. अभिष्टचिंतन सोहळा प्रसगी प्रास्थाविक करताना सदाशिवदादा पुपुलवाड  म्हणाले की, कैलासभाऊचे आजोबा कै,बाबासाहेब गोरठेकर यांनी निस्वार्थीपणे राजकारण केले आणि गोर गरीब जनतेची सेवा केली. त्यांच्या जवळ कोणताही पीए नव्हता सामान्य माणसाचा फोन जर आला तर ये स्वतः  उचलत असत, आणि परिस्थिती समजून घेऊन समोरच्या व्यक्तीला किंवा अधिकाऱ्याला सोबत धेऊन सामान्य माणसाचे काम करीत होते. त्याच प्रमाणे त्यांचे चिरंजीव बापुसाहेब देशमुख गोरठेकर हेसुध्दा त्याच प्रमाणे त्यांच्या विचारांवरती पाऊल ठेवून सामान्य माणसातील गरीबांचे कोणतेही काम असो निस्वार्थीपणे काम करत आहेत, त्याच प्रमाणे कैलासभाऊ मी तुम्हाला सागतो की तुम्ही या नायगाव विधानसभा क्षेत्राचे नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पुढे सरसावला आहात, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, आजोबांनी व वडिलांनी कोणताही पीए ठेवलेला नाही, कोणाचाही फोन येवो ते स्वतः उचलतात आणि बोलतात. एवढेच नव्हे तर त्या सामान्य माणसाचे समाधान करत होते, तुम्ही पीए न ठेवता कोणत्याही सामान्य गरीबातील गरीब माणसाचा फोन आला तर  विलंब न करता स्वतः उचलून बोलावे, त्याचे काम प्रामाणिक पणे करावे असे म्हणाले.