हिंगोली :(दि.15 मार्च )
       रमेश गंगासागरे
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोहर लक्ष्मण खिलारी हे आज 15 मार्च रोजी 5 हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने रंगेहात पकडून अटक केली आहे.त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
     घटनेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी की पंचायत समिती कार्यालयाकडून अनेक शेतकऱ्यांना विविध योजना मिळत असताना यातील जनावरांसाठी एक गोठा  होता तक्रारदार यांच्या वडिलांना मंजूर झाला त्या गोठ्याचे कार्यारंभ आदेश आणि भावाला मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी हे पैसे दिल्याशिवाय काम करणार नसल्याचे सांगली तक्रारदार यांना पैसे देऊन काम करून घेण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नांदेड मध्ये जाऊन रितसर तक्रार दाखल केली त्यानुसार कार्यालयाने आज 15 मार्च रोजी गुप्त सापळा लावला ह्याच आपल्या ग्रुपच्या समर्थ लोकसेवक गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले त्यामुळे त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला सापळा यशस्वी करण्यामध्ये मार्गदर्शक:- मा.श्री डॉ राहुल खाडे, पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र,नांदेड.   
श्री धरमसिंग चव्हाण,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र, नांदेड कार्यवाही पथक:- श्री. निलेश सुरडकर, पोलिस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक श्री. प्रफुल्ल अंकुशकर, ASI युनूस सिद्दीक,HC विजय उपरे,HC शुक्ला, NPC रुद्रा कबाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, राजाराम फुफाटे, तानाजी मुंडे, सुजित देशमुख, LNPC योगिता अवचार, हिमतराव सरनाईक सर्व ACB टीम हिंगोली.