उमरी :( दि.10 मार्च )
रमेश गंगासागरे
महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती शहर व खेड्यापाड्यातील नागरिकांना व्हावी या उदात्त हेतूने श्री संत गाडगेबाबा सांस्कृतिक कला मंच व शैक्षणिक सेवाभावी संस्था भोसी तालुका भोकर यांच्या वतीने उमरी तालुक्यातील कारला, बोळसा, ढोलउमरी, व उमरी शहरामध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्याद्वारे जनजागरण करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन प्रेरीत "ध्यास आमचा सामाजिक न्यायाचा" अंतर्गत सदरील संस्थेचे कार्य संबंध नांदेड जिल्ह्यामध्ये चालत आहे. यामध्ये रमाई आवास योजना, चर्मकार गटई कामगारांना गटई स्टॉल वाटप योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, कन्यादान योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मुला मुलींसाठी शासकीय वस्तीग्रह समाजकल्याण संस्थांना अनुदान, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, अनुसूचित जाती- जमातीअत्याचाराचामध्ये बळी ठरणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना अर्थसहाय्य, यासह अनेक योजनांची माहिती सदरील कला मंचाद्वारे शाहीर शंकर गायकवाड, मिलिंद सरपाते, श्याम सुंदर गायकवाड, सुरेश गायकवाड, उषाताई गायकवाड, निर्मलाबाई गायकवाड, प्रकाश गायकवाड, सविता गायकवाड, नागोराव गायकवाड, धम्मदीप जाधव यांनी सहभाग नोंदवला होता.
0 Comments