नांदेड: (प्रतिनिधी)
       येथील श्री गुरू गोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. 
       स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. विकास कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी उपस्थित होते. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाने सुद्धा यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.