भोकर :(दि.13 मार्च )
           भोकर तालुक्यातील तामसा रोड वरील गट क्रमांक 536, ह्या पाच एकर जमिनीचा वाद मारहाणीनंतर पोलीस ठाणे भोकर पर्यंत पोहोचला असून दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारी प्राप्त झाल्याने भोकर पोलिसांनी दोन्ही गटातील 8 जणांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये भोकर काँग्रेसचे शहराध्यक्ष खाजू  ईनामदार यांचा समावेश आहे.
       घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली थोडक्यात माहिती अशी की, मोहम्मद अयुब मोहम्मद युसुफ मांजरमकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 
 मी मागील चार महिन्यापुर्वी माझे ईवाई नामे खाजा शदरोद्दीन खाँजा मोयोद्दीन रा. इनामदार गल्ली भोकर यांनी त्यांचे तामसा रोड भोकर शिवारातील गट क्रमांक 536 मधील अंदाजे पाच एकर जमीन माझा मुलगा नामे मोहम्मद अलमास मोहम्मद युसुफ व माझ्या मोठ्या मुलाचा मेव्हना नामे सय्यद अहमद सय्यद फकीर यांच्या नावे वीस वर्षासाठी बटाऊने करून खान्यासाठी बॉन्डवर लिहून दिले आहे,सदरची जमीन ही आमच्या ताब्यात असुन आम्ही ते कसुन खातो, दिनांक 12 मार्च रोजी मी सदरील शेत पहाण्यासाठी मी गेलो असता, त्या ठिकाणी 1) रमिजोद्दीन ऊर्फ खाजु इनामदार 2) तमिजोद्दीन ऊर्फ जावेद इनामदार दोघे रा. भोकर हे तिथे येऊन सदरची जमीन ही आम्ही विकत घेतली आहे तु येथे कशासाठी आला आहेस असे म्हणून त्या दोघानी गच्ची पकडुन लाथा बुक्यांनी मारहाण केली, बहिनिवर अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारु, अशी धमकी दिली व पुन्हा भोकरकडे येत असतांना डि.बी. कॉलेज जवळ  तखियोद्दिन ईनामदार व शाकेब हे येवून  आमच्या शेतात का गेला होतास असे म्हणून परत थापड बुक्याने मारहाण केली व ते तिथुन निघून गेले. असे म्हटले आहे.
       तर दुसरे फिर्यादी रमिजोद्दीन ईनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीत 1)मोहम्मद अयुब मोहम्मद युसुफ, 2)अस्लम आयुब, 3)अलमास व ईतर एक असे दोन्हीकडील 8 जनावर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.कराड आणि शिरोळे हे करत आहेत.