भोकर:(दि.9 फेब्रुवारी)
   रमेश गंगासागरे
भोकर शहरातील काही भागात एका पिसाळलेल्या खतरनाक कुत्र्याने अनेक नागरिकांना चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना शहरात घडली आहे.
       घटनेबाबत हाती आलेली थोडक्यात माहिती अशी की आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी भोकर शहरातील रशिद टेकडी भागात सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान एका पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक जणांच्या तोंडाला, छातीला आणि पायाला चावा घेतला. यात प्रणव प्रमोद मस्के वय 3 वर्ष, समीक्षा बोडेवार वय 6वर्षे, शादाब शहरुख कुरेशी वय 2 वर्षे, रिहान बाबा कुरेशी वय 6 वर्षे, शबाना बेगम वय 40 वर्षे हे गंभीर जखमी झाले तर  यातील 3 मूलांना अधिक उपचारासाठी नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे. जखमींवर डॉ. नितीन कळसकर , वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून  स्टफ नर्स श्रीमती ज्योती शेंडगे, मनोज पांचाळ यांनी तात्काळ मदतीसाठी धावून आले.
      दरम्यान भोकर शहरामध्ये मोकाट जनावरांची व कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने कुत्रे सकाळच्या प्रहरी मोठमोठ्याने भुंकून दूध वाल्याच्या मागे लागत आहेत, अक्राळ विक्राळ रूप धारण करून अनेक सायकल स्वार विद्यार्थी मुलांचा पाठलाग करत आहेत, त्यामुळे महिला व मुलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. म्हणून अशा कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.