भोकर :(दि.9फेब्रुवारी)
   रमेश गंगासागरे  
             आजादी का अमृत महोत्सव या अनुषंगाने दि.01/02/2022 ते 07/02/2022 या दरम्यान दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात गणित विभाग, अंतर्गत मूल्यांकन कक्ष  व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र  मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने अभासी पध्दतीने गणित विषयाची  सात दिवशीय राष्ट्रीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय व्याख्यानमालेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. उद्धवजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी गणित विषयातील मिळालेल्या ह्या संधीचा योग्य तो फायदा घेत आपल्या आयुष्याला योग्य दिशा द्यावी, तसेच अशा प्रकारच्या गणित विषयाची राष्ट्रीय व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल  महाविद्यालयाचे अभिनंदन केले. गणित ही ज्ञानाची जननी असून व्यक्तीच्या व समाजाच्या प्रत्येक क्षणात गणित हा विषय महत्त्वपूर्ण आहे  असे मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री  तथा दिगंबरराव बिंदू स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर यांनी व्यक्त केले. या राष्ट्रीय व्याख्यानमालेचे प्रमुख पाहुणे म्हणून  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र  मुक्त विद्यापीठ नाशिक येथील विज्ञान व तंञज्ञान संकुलाच्या संचालिका  डॉ. सुनंदा मोरे यांनी अशा प्रकारच्या आभासीय व्याख्यानमाला विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवून आणतात या व्याख्यान माले मुळे प्रवाहाबाहेरील  विद्यार्थी देखील ज्ञानाच्या प्रवाहात येण्यास खूप मदत होते त्यामुळे त्यांनी विशेषतः  गणित विभाग प्रमुख डॉ. सतीश चव्हाण यांचे आयोजक म्हणून विशेष अभिनंदन केले तर. विशेष पाहुणे म्हणून डॉ. एल. एम. वाघमारे अधिष्ठाता,सायन्स विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, डॉ. के. एल.बोंदर सहसंचालक उच्च शिक्षण विभाग पुणे व डॉ.डी. डी. पवार अध्यक्ष गणित अभ्यास मंडळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, यांनी गणित विषयाबद्दल विद्यार्थ्यांना  महत्व पटवून दिले. या राष्ट्रीय व्याख्यानमालेचा लाभ महाराष्ट्र व इतर राज्यातील एकूण 550 विद्यार्थ्यांनी घेतला गणित विषयातील अनेक विषय या व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांच्या समोर झूम ऑनलाइन च्या माध्यमातून सादर करण्यात आले या व्याख्यान मालेस साधन व्यक्ती म्हणून  महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातील   डॉ. नितीन दारकुंडे,डॉ.राहुल मापारी, डॉ.डी डी. पवार, प्रा. प्रतुल गडाकर, डॉ.हरिभाऊ तिडके, डॉ.मोहन चिंतामणी,डॉ. व्ही.सी. बोरकर,डॉ. सतीश चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या व्याख्यानमालेचा समारोप दिनांक 08/02/2022  रोजी झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बिंदू  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण हे होते आपल्या अध्यक्षीय भाषनात त्यांनी  असे प्रतिपादन केले  की, अलीकडच्या युगात काळाबरोबर चालावयाचे असेल तर अशा प्रकारच्या व्याख्यानमालेचा उपयोग आपल्या जीवनात करणे अत्यंत आवश्यक आहे याद्वारे आपण ज्ञानाने अपडेट राहू नाहीतर आपण आत्ताच या स्पर्धेतून बाहेर राहू .तसेच गणित हा विषय प्रत्येक क्षेञात आवश्यक आहे असे सांगुन गणित विभागाचे अभिनंदन  केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. एस.एम जोगदंड सरांनी विद्यार्थ्यांना गणित विषयातील संधी कोणत्या आहेत याबद्दल सखोल मार्गदर्शन करत असे मत व्यक्त केले की, अशा प्रकारच्या अभासी व्याख्यान  मालेमुळे विद्यार्थी नियमित ज्ञानाच्या सतत प्रवाहात राहील. या समारोपीय कार्यक्रमात डॉ. डी. डी.पवार व डॉ.आर.एन.इंगळे यांनी ही आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले आयुष्यातील येणाऱ्या प्रत्येक संधीचे व मिळणाऱ्या ज्ञानाचे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ग्रहण केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. या व्याख्यानमालेचे मुख्य आयोजक प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण, आयोजक गणित विभाग प्रमुख डॉ. सतीश चव्हाण सह -आयोजक डॉ. अरविंद चव्हाण  सचिव प्रा.प्रशांत टाके व सहसचिव महाविद्यालयातील  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक डाँ.राधाकिशन होगे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत टाके, व  प्रा. मुकुंद येगावकर यांनी केले ही व्याख्यानमाला यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले