रमेश गंगासागरे
भोकर गंदेवार कॉलनी भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्दोजक श्री,श्रीनिवास बाबुराव बिल्लरवार आंदबोरीकर वय 40 वर्षे आणि प्रफुल्लनगर भागातील उपा.प्रकाश जाधव वय 34 वर्षे या दोघांचे आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले, ह्या दोन उमद्या तरुणांचे एकाच दिवशी आकस्मात निधन झाल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रफुल नगर भागातील माजी मुख्याध्यापक देविदास जाधव यांचे प्रकाश जाधव हे सुपुत्र आहेत, तर भोकर शहरातील उद्योजक तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री बाबुराव पाटील आंदबोरीकर यांचे श्रीनिवास हे जुळे चिरंजीव पैकी एक आहेत. हे दोघेही तरुण ऐन तारुण्यात होते, नियतीने या दोघांवर आज डाव साधला असून मित्र, माता, पिता, मुले आणि सगे सोयऱ्या पासून दूर नेले आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रकाश जाधव यांच्यावर बौद्ध स्मशानभूमीत आज सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, प्रकाश जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, माता पिता, आजी-आजोबा, भाऊ असा मोठा परिवार आहे. तर श्रीनिवास यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, 2 मुले असा मोठा परिवार आहे. श्रीनिवास यांच्यावर भोकर येथिल हिंदू स्मशान भूमीत आज रात्री 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दोन्ही तरुणांच्या परिवारास ईश्वर दुःख पेलण्याची शक्ती देवो. या दोन्ही तरुणांना भोकर न्युज लाईव्ह परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments