भोकर :(7 फेब्रुवारी)
   रमेश गंगासागरे
       सध्या भोकर शहरातील दुभाजकामध्ये आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचे कार्य चालू आहे त्यासाठी रस्त्यामध्ये खड्डे खोदून झाडे लावत असल्याने संबंधित कार्यालयावर वाहनधारक आणि भोकरचे नागरिक नाराज असल्याचे दिसून येत आहे.
       भोकरच्या वैभवा मध्ये भर पडावी, भोकर ग्रीन सिटी व्हावी, भोकर शहर हे सुंदर शहर दिसावे, ईतर तालुक्यांमध्ये भोकर शहराचे नाव व्हावे, या उदात्त हेतूने शहराचे सौंदर्यीकरण करणे चालू आहे. सौंदर्यीकरण चालू असताना रस्त्याच्या दुतर्फा डांबरी रस्त्यावर जेसीबी मशिनच्या साह्याने मागील तीन ते चार महिन्यापूर्वी पंधरा ते वीस फुटावर मोठे मोठे खड्डे खोदण्यात आले. पण  आजपर्यंत 100% झाडे लावण्यात आली नाहीत. त्यामुळे खोदलेल्या खड्ड्यात अनेक वाहनधारक वाहनासह पडत आहेत, तर रात्रीला अनेक नागरिकांना खोदून ठेवलेल्या खड्ड्याचा त्रास होत असल्याचे येथील नागरिक बोलून दाखवत आहेत.
       दुसरीकडे रस्ता रुंदीकरणासाठी अनेक वेळा अतिक्रमण काढले जात आहे, तर रस्त्यामध्ये झाडे लावण्याच्या प्रकारामुळे झाडाच्या सावलीत हातगाडेवाले, फेरीवाले व किरकोळ दुकानदार यांचे भविष्यात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची चिंता भोकरचे वाहनधारक करत आहेत, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येऊ नयेत अशा प्रकारची मागणी वाहनधारक व नागरिक करताना दिसून येत आहेत.