भोकर (दि. 13 जानेवारी)
रमेश गंगासागरे
भोकर शहर व तालुक्यामध्ये विकास कामावर भर दिला जात असून यापूर्वी भोकरच्या दत्त गडाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच नांदेड रोडवरील नारवाट जवळील गुड्डा महादेव मंदिर व तलावाचे सुद्धा सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे भोकर शहराच्या सौंदर्यामध्ये मोठी भर पडली आहे. आता शहराच्या पूर्वेस असलेल्या कन्या शाळेजवळील महादेव मंदिराचा तलाव सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी श्री विपिन इटनकर आणि भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी नुकतीच पाहणी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोक चव्हाण हे भोकर च्या विकासावर लक्ष केंद्रित केले असून त्यांनी भोकर शहर व तालुक्यात विविध विकास कामावर लक्ष केंद्रित केले आहे आता महादेव मंदिराची यात्रा ज्या तलावाच्या मैदानात वाटते त्या तलावाचे सुशोभीकरण करावे अशी अनेक नागरिकांची मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने आज 03 जानेवारी रोजी दुपारी जिल्हाधिकारी यांच्या सोबत भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी तलाव व मंदिर परिसराची पाहणी केली असून काही दिवसानंतर भोकर शहराच्या सौंदर्यामध्ये अजून एका तलाव सुशोभीकरणाची भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आतापासूनच नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.
0 Comments