भोकर : ( दि.25 फेब्रुवारी)
       रमेश गंगासागरे
     भोकर तालुक्यातील मेंडका येथील ही घटना असून करणी केल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत बेदम मारहाण केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4  वाजण्याच्या दरम्यान मेंडका येथील फिर्यादी महिलेच्या घरात कोणीही नसल्याचे पाहून आरोपी गोविंद पामलवाड आणि बालाजी पामलवाड हे घरात घुसून आमच्यावर करनी करतोस काय? असे म्हणून खाली पाडुन बेदम मारहाण केली, तसेच छाती दाबुन विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध भोकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री लक्षटवार  हे घटनेचा अधिक तपास करत आहेत.