भोकर :(दि.5 जानेवारी)
    रमेश गंगासागरे
     भोकरहुन उमरीकडे जाणाऱ्या उमरी बायपास रोडवरील चौकात दररोज छोटे मोठे अपघात घडत असून या ठिकाणी जणू अपघाताची मालिकाच चालू झाल्याचे दिसून येत आहे.
       आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उमरीकडून भोकर येणारी बोलेरो पीक अप गाडी क्र. MH - 26 BE 6068 ही चौकात येताच नांदेड कडून मैसा कडे जाणाऱ्या एका ट्रकने जोराची धडक दिली या धडकेत जीवित हानी झाली असून बोलेरो पिकप मधील दोघांना किरकोळ दुखापत झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी नागरिक बोलत आहेत. ही धडक एवढी जोराची होती कि बोलेरो पिकप गाडीचे तोंड  पूर्णपणे विरुद्ध दिशेला झाले. बोलोरो पिकप गाडी चे अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
       ह्या चौकांमध्ये दररोज अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्यामुळे या ठिकाणी बायपास रोडवर उड्डाणपूल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.