अमरावती :(दि.4 फेब्रुवारी)
        (वृत्त सेवा)
         अमरावती जिल्ह्यातील सावंगी मरगापूर येथील गावात असलेल्या दलितांना दररोज छळले जात असून त्यांच्या वस्तीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असल्याने अखेर तेथील दलितांना गाव सोडावे लागल्याच्या व्रताने राज्यात खळबळ उडाली आहे.
      जिवाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे राज्यात जातीयवादी नागरिक डोकी वर काढत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. माणसाला जिवंत रहाण्यासाठी अत्यावश्यक गर्जेतील पाणीच जातीयवाद्यानी बंद केले. तेथिल नागरिकांनी पाणी पुरवठा सुरळीत करावा यासाठी अनेकवेळा विनंत्या केल्या,पण सर्व प्रयत्न व्यर्थ झाले, जातीयवाद्यायचे काळीज पाषाणाचे होते, म्हणून त्यांना पाझर फुटला नाही, अखेर 3 दिवसांनी तेथिल दलितांना पिण्याच्या पाण्यासाठी मुलाबाळासह वणवण भटकंती करावी लागली. अन गावापासून दूरवर जाऊन निवारा आणि पाणी शोधावे लागले, ही घटना जेव्हा सर्वत्र पसरली तेव्हां अमरावती येथील दलित संघटनांनी प्रशासनाला धारेवर धरले तेंव्हा प्रशासनाने दलित नागरिक रहात असलेल्या नवीन निवाऱ्याच्या ठिकाणी पाण्याचे एक टँकर पाठवणे पण दलितांना पाण्याचे टँकर स्वीकारले नाही त्यांना विनाकारण दलित वस्ती चा पाणी पुरवठा खंडित करणाऱ्या जातीयवाद्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल करून आपल्या हक्काच्या नळा मधूनच पाणी मिळायला हवे, अशी मागणी केली. 
      दलितांना जातीय अत्याचाराला कंटाळून गाव सोडण्याची ही अमरावतीतील दुसरी घटना आहे. अचानक गेल्या वर्षभरात जातीय अत्याचारात अमरावतीत वाढ झालेली आहे. अचानक सामाजिक सलोखा बिघडून वातावरण दूषित करणाऱ्या प्रवृत्ती सक्रिय कशा काय झाल्यात? याकडे ग्रह खात्याने गांभिर्याने पाहावे. अन्यथा दलित संघटना गप्प बसणार नसल्याचा इशारा दलित संघटनांनी दिला आहे. दलित वस्तीतील पाणी खंडित प्रकारानंतर दलितांना मारण्याच्या दलितांवर बहिष्कार टाकण्याच्या धमक्या तेथील जातीयवादी नागरिक देत असल्याने त्यांना तात्काळ सुरक्षा द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.