उमरी :(20 फेब्रुवारी)
  गंगाधर सवई
        येथील रापतवार नगर लुंबिनी बुद्ध विहीरात छत्रपती शिवाजी महाराज, संत सिरोमणी  रविदास महाराज या दोन महापुरुषांची शनिवार दि.19 फेब्रुवारी रोजी मोठ्या  हर्ष उल्हासात संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.                   सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाणी डॉ. राजेश सवई हे होते. प्रमुख पाहुणे राहुल खंदारे, माधवकाका सुर्यवंशी, रोहीदास सोनटक्के,आंबुबाई जाधव यांची उपस्थिती होती.  सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार गंगाधर सवई यांनी केले. यावेळी रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकताना डॉ. राजेश सवई म्हणाले की, शिवरायाला राजमाता जिजाऊ यांनी लहान वयात स्वराज्य स्थापन करण्यासाठी जी शिकवण दिली,, त्यात आपल्या राज्यात स्त्रियांवर अण्याय अत्याचार होणार नाहीत अशी शिकवण दिली, म्हणून शिवरायांच्या राज्यात स्त्रियावर कधीच अत्याचार झाले नाहीत, झालेच तर त्यांना राजे खतम करीत होते, आता तर दीवसा ढवळ्या दररोज स्त्रियांवर अत्याचार होत आहेत,  या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शीवरायाच्या विचारावर संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुता नांदावी म्हणून बाबासाहेबांनी सविधान या देशाला बहाल केले, परतु येथील राज्यकर्ते  संविधान चागल्या प्रकारे चालवत नाहीत, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ,मी संविधान लीहीले आहे परंतु, संविधान चालवणारे लोक चांगले नसतील तर, संविधान कितीही चांगले असले तरी त्यांचा काहीही फायदा होत नाही. असेही म्हटले होते, या कार्यक्रमात महिलाचा मोठा सहभाग आहे, माझ्या आई बहीणीना हात जोडून सागतो की, आपण आपल्या मुलांना मुलींना शाळेत पाठवून शिक्षण भरपुर शीकवावे आणि दररोज सकाळी संध्याकाळी वंदना घेण्यासाठी बुद्ध विहारात पाठवावे. असे विचार डॉ, राजेश सवईनी मांडले,                 
       तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना म्हणाले की फेब्रुवारी हा महीना आपल्या सर्वासाठी आनंदाचा महिना आहे. कारण ह्या महीन्यात रामजी सुभेदार यांचा स्मृती दीवस, रमाई जयंती, संत रविदास महाराज यांची जयंती, सेवालाल महाराज याची जयंती, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती, पहा एकाच महीण्यात एवठ्या महापुरुषांच्या जयंत्या आहेत. म्हणून म्हणतो की, आपण भाग्यवान आहोत, आपल्याला महापुरुषांचा खरा इतिहास समजु दिले नाहीत, आज या घडीला तरूणांना व्यसनाधीन करून सोडले आहे, तरूणांनी शिवाजी महाराजांची शिकवण आंगीकारावी असे ते म्हणाले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सदानंद गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन ऍड,भिमराव सवई यांनी मानले,
यावेळी आंबुबाई जाधव, महामायाबाई सवई, ताईडीबाई, राधाबाई सवई ,अंजनाबाई सवई, यशोदा सवई, प्रतिभा सवई, शिलाबाई भरजे, सतोष सुर्यवंशी, त्रिशा, दशरथ सुर्यवंशी, प्रेम अनपुर्ण, समिक्षा, राजेश कुतेवाड, प्रतिक्षा, सदीप सोनटक्के, दत्ता लोखंडे, शेषेराव हनमंते, किशनराव मुदीराज, व्यंकटराव सोनटक्के, नारायण अहीले, पिल्या, रामदास हैबतकर, यांच्यासह महीला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.