रमेश गंगासागरे
जगद्गुरू संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांची जयंती दिनांक 27 फेब्रुवारी रोजी भोकर शहरामध्ये , शोभायात्रा काढुंन मोठयाहर्ष उल्हासाने साजरी करण्यात आली.
रविवारी सकाळी भोकर येथील नगरपरिषद कार्यालयापासून निघणाऱ्या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज बांधव शोभायात्रेत सहभागी झाले होते. यामध्ये पारंपारिक वेशभूषा परीधान करून महिला सहभागी झाल्या होत्या. तर तरुण मंडळी मोटारसायकल वर संत सेवालाल महाराज यांचे ध्वज घेऊन सहभागी झाले होते, संत सेवालाल महाराज की जय, एकच लाल सेवालाल, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. हलगीच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होते, ही शोभायात्रा भोकर येथील नगरपरिषदे पासून निघून डॉक्टर आंबेडकर चौक, शिवाजी चौक आणि परत किनवट रोड येथील नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी दुपारी जाऊन विसर्जित झाली. शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर महिला नागरिक सुंदर वेश परिधान करून सहभागी झाले होते.
0 Comments