नांदेड :(दि.26 फेब्रुवारी)
   रमेश गंगासागरे
       बंधू-भगिनीनों आज प्राथमिक ते उच्चशिक्षण प्रणाली एका विचित्र संक्रमणावस्थेतून जात आहे, याचे नाही म्हटले तरी आपण मूक साक्षीदार बनलो आहोत. विशेषतः सध्या कोरोना विषाणूंच्या सावटाखाली तर सबंध शैक्षणिक यंत्रणेचा बोजवारा उडालेला दिसतो आहे. 
       जो तो 'हाताची घडी तोंडावर बोट' या उक्तीची शिस्त पाळताना दिसतोय. अशा विदारक स्थितीत 'स्वाभिमानी मुप्टा संघटना' आपल्या कर्तृत्वावर अढळ आहे. मराठवाड्यात बीड, लातूर, उस्मानाबाद औरंगाबाद आदी ठिकाणी संघटनेने मेळाव्याचे आयोजन करून रणशिंग फुंकले. हे रणशिंग व्यवस्थेच्या विरुद्ध अन्याय व अत्याचाराच्या विरोधात न्याय हक्कांसाठी फुंकलेले रणशिंग होय. स्वाभिमानी बाणा जागृत ठेवून नांदेड जिल्हास्तरीय मेळावा स्वाभिमानी मुप्टा संघटना आयोजित करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सुसंवाद आणि समस्यांवरील उपायांची रणनिती हा या उपक्रमाचा हेतू आहे. आपणही आपला सहभाग व उपस्थिती नोंदवण्यासाठी  सर्व प्राध्यापक व शिक्षकांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्द्घाटक म्हणून मा. डॉ. विठ्ठल मोरे (सहसंचालक, उच्चशिक्षण विभाग, नांदेड) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रो. डॉ. शंकर अंभोरे (संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी मुप्य संघटना) प्राचार्य डॉ. शेखर घुगरवार (विभागीय अध्यक्ष) प्रा. डॉ. अनिल गच्चे  (जिल्हाध्यक्ष, नांदेड) प्रा. डॉ. उषा सरोदे (अध्यक्ष, पित्रापीठ कॅम्पस)
प्रा. डॉ. बलभीम वाघमारे  प्रा.डॉ. सु.टी. गायकवाड
(विभागीय कार्याध्यक्ष) (विभागीय सचिव) प्रा.डॉ. सुनिलचंद्र सोनकांबळे (जिल्ला कार्याध्यक्ष) प्रा.डॉ. शे. शहनाज बेगम प्रो.डॉ. रमेश ढगे (कार्याध्यक्ष, विद्यापीठ कॅम्प्स)(जिल्हा सचिव)  प्रा. डॉ. बालाजी मुधोळकर (समिन विद्यापीठ कॅम्पस) सदरील मेळावा हा 
 रविवार, दि. २७ फेब्रुवारी २०२२ सकाळी १०.३० वाजता हॉटेल पूजा गार्डन, डॉ. आंबेडकर चौक, लातूर फाटा नांदेड येथे होत आहे.