रमेश गंगासागरे
जगद्गुरू संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 645 व्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड येथे भव्य उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदरील उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी मालेगाव रोडवरील वसुंधरा हॉलमध्ये सकाळी 11 वाजता सदरील विभागीय उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र प्रदेश यांचे संस्थापक अध्यक्ष मा श्री बबनरावजी घोलप राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक मा श्री दिनेश डिंगळे व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ मुंबई हे राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक मा श्री अशोक रावजी माने संस्थापक अध्यक्ष रत्नप्पा कुंभार सहकारी सूतगिरणी जयसिंगपूर यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर नांदेड, मोहनरावजी हंबर्डे आमदार नांदेड त्यांचेसुद्धा उपस्थिती लागणार आहे सदरील कार्यक्रमांमध्ये औरंगाबाद येथील पोलीस उपायुक्त श्री बालाजीराव सोनटक्के आणि राजू रामेकर एम बी बी एस रेडिओलॉजिस्ट आदीलाबाद यांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यासाठी चर्मकार समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन आस्तिक कोरडे आणि आयोजक माधव गायकवाड यांनी केले आहे.
0 Comments