चिखली :(दि.23 फेब्रुवारी)
रमेश गंगासागरे
महाराष्ट्रा मध्ये आणि भारतामध्ये गुरू रविदास यांच्या सारखे अनेक संत महात्मे होऊन गेले त्यांनी आपल्यासाठी अनेक कष्ट घेऊन चांगले कार्य केली आहेत, त्यांनी आपणास प्रगतीचा मार्ग दाखवला आहे, पुस्तके लिहिली आहेत,त्यामुळे त्या पुस्तकाचे वाचन करून त्यांचे विचार आत्मसात करा, त्यांना समजून घ्या, डोक्यात त्यांचे विचार घ्या,
बाकी कोणत्याच देवाला डोक्यावर घेऊन नाचण्याची गरज पडणार नाही, असे उद्दगार अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी गुरु रविदास जयंती मध्ये व्यक्त केले, ते चिखली ता. जिवती जि. चंद्रपूर येथे अध्यक्षीय समारोप करताना सलग 1तास 45 मिनिटे बोलत होते.
जिवती जि. चंद्रपूर या सीमावर्ती अतिदूर व दुर्गम डोंगराळ भागात मंगळवार दि.22 फेब्रुवारी रोजी संत श्री, गुरू रविदास यांची ६२४ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी झाली. यावेळी मंचावर श्री,संबा वाघमारे, इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, सुप्रसिद्ध विचारवंत मधू बावलकर, संपादक रमेश गंगासागरे श्री,जाधव यांच्यासह ईतर अनेक मान्यवर विराजमान झाले होते. देगलूरकर पुढे बोलतांना म्हणाले की, संत श्री गुरू रविदास महाराज यांची जन्मतारीख 15 फेब्रुवारी निश्चित असून ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू इज शुद्र? ( अस्पृश्य मूळचे कोण होते?) या ग्रंथामध्ये लिहून रविदास यांना गुरु मानून त्यांनी हा ग्रंथ रविदास यांच्या चरणी अर्पण केला, आणि प्रथम दिल्ली येथे रविदास महाराजांची १ ली जयंती साजरी केली आहे. त्यामुळे प्रत्येक समाज बांधवांनी 15 फेब्रुवारी रोजी रविदास महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे. अनेकजन गुरु रविदास यांची जयंती माघ पौर्णिमेला साजरी करतात पण ही माघ पौर्णिमा कधी पंधरा दिवस पुढे तर कधी पंधरा दिवस मागे जाते, निश्चित कोणत्याही एका तारखेला येत नाही असे ते यावेळी म्हणाले. रविदास म्हणतात "मन चंगा तो, कठौती में गंगा" तुमचे मन जर शुद्ध असेल तर आपल्या घरातील पाणी गंगे समान निर्मळ आहे, मग काशीला जाऊन नदीमध्ये अंघोळ करण्याची गरजच काय आहे? काशी मधील नदीतील पान्यात मेलेले मुदडे आणि राख टाकत असल्यामुळे नदीचे पाणी अशुद्ध झाले आहे, तेथील गंगा त्याकाळीही दूषित होती आणि आजही दूषित आहे. म्हणून रविदासांनी त्यावेळी अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली. असून समाज बांधवांनी अंधश्रद्धा, रूढी,परंपरा बाजूला ठेवून विज्ञानवादी विचार रुजवत जगले पाहिजे, तरच आपले आणि येणाऱ्या नवीन पिढीचे जीवन सफल होईल असे ते यावेळी म्हणाले. यावेळी सुप्रसिद्ध विचारवंत मधु बावलकर, भिमशाहिर वाघमारे, जाधव यांच्यासह अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. जयंती मंडळातर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प आणि साहित्य भेट देऊन करण्यात आले. जयंती चे ठिकाण हे मागासलेल्या दुर्गम भागात असूनही तेथील जयंती मंडळाने ड्रोन कॅमेरा च्या साह्याने संपूर्ण जयंतीचे चित्रीकरण केले हा आकर्षणाचा भाग बनला होता. चिखली गावात श्री चंद्रप्रकाश देगलूरकर आणि त्यांचे सहकारी यांचे आगमन होताच त्यांची गावातून ढोल ताशाच्या गजरात ड्रोन कॅमेरा च्या साह्याने चित्रीकरण करत कार्यक्रम स्थळा पर्यंत आणण्यात आले. देगलूरकर यांना नांदेड हुन तीनशे किलोमीटर दूर असलेल्या दुर्गम भागातील चिखली पर्यंत पोहोचण्यासाठी दुपारचे दोन वाजले होते, तरीही चिखली गावातील नागरिकांचा उत्साह कायम होता. जयंतीचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालला हे विशेष. शेवटी जयंती मंडळाच्या वतीने सर्वांना अन्नदान करण्यात आले होते, त्यामुळे सर्व स्तरातून जयंती मंडळाचे अभिनंदन केले जात आहे.
0 Comments