भोकर, (रमेश गंगासागरे)
दि.20 फेब्रुवारी
19 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर तामसा रोड येथून शहराच्या मुख्य रस्त्याने
मोटार सायकल रॅली काढण्यात आली त्यानंतर दुपारी एक वाजता च्या दरम्यान शिवाजी चौक येथून एका सजवलेल्या रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळा ची मिरवणूक मुख्य रस्त्याने करण्यात आली या मिरवणुकीमध्ये ढोल ताशे नगारे लेझीम पथक भजनी पथक बँड पथक अश्व पथक त्या सर्वांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते मिरवणूक मुख्य चौकात येतात ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो या घोषणेने परिसर दणाणून गेला चौकामध्ये कला पथकांनी आपल्या विविध कला सादर केल्या होत्या. सदरील मिरवणूक शांततेच्या मार्गाने बालाजी मंदिर, गांधी चौक, मार्गाने पुन्हा शिवाजी चौकांमध्ये संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान येऊन विसर्जित झाली. मिरवणुकीमध्ये सर्व जाती-धर्माचे व पक्षाचे नागरिक सामील झाले होते. निवडणूक अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पडली. मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी चोख बंदोबस्त लावला होता. सदर मिरवणुकीवर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी समाधान व्यक्त केले असून त्यांनी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments