नांदेड : (दि.2 फेब्रुवारी)
    रमेश गंगासागरे
     स्वप्न पाहाणं महत्त्वाचं आहे. तर ती साकार करण्यासाठी रात्रीचा दिवस केला जातो. नांदेडच्या व्यक्तीनं एक भन्नाट स्वप्न पाहिलं. वीज वितरण कंपनी मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने भन्नाट सायकल तयार केली आहे. ही सायकल एकदा चार्ज केली की तब्बल 250 किमीपर्यंत धावते.असा त्यांनी दावा केला आहे. अशी ही भन्नाट सायकल पहाण्यासाठी दररोज अनेक नागरिक येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.