भोकर :(दि.17 फेब्रुवारी)
      रमेश गंगासागरे 
भोकर मधील एका राष्ट्रीय पक्षाच्या जबाबदार कार्यकर्त्याने पक्षात होत असलेली घुसमट दुसऱ्या  एकास फोनवरून बोलून दाखवली खरी, पण बोलण्याच्या ओघात त्यांनी आपली जबाबदारी धाब्यावर ठेवून थेट जिल्हाध्यक्ष यांनाच खालच्या दर्जात अपशब्द  वापरल्याने त्यांना पक्षातूनच मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर थेट राज्याचे बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री यांना खेटण्याची भाषा केल्याने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांचा शोषल मीडिया वरून विरोध करत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे दोन्ही पक्ष वरच्या लेव्हलवर जरी एक असले तरी मात्र, भोकर मध्ये दोन्ही पक्षांतर्गत धुसफूस चालू असल्याचे दिसून येत आहे.
       या बाबद मिळालेली माहिती अशी की, सध्या भोकर शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीची चाहूल लागणार असल्याची चर्चा वेगाने पसरत आहे. त्यामुळे अनेक जण कामाला लागले आहेत, अशातच एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पण घेतला होता, त्या अनुषंगाने विद्यमान पदाधिकारी यांनी पक्षाच्या एका कार्यकर्त्यास फोन करून पक्षात होत असलेली घुसमट व्यक्त केली होती, तसेच मेळावा होताच काही दिवसांनी आपण स्वतः पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी फोनवरून सांगितले होते, तसेच बोलण्याच्या ओघात त्यांनी जिल्हाध्यक्ष यांना  खालच्या पातळीत एक शिवी सुद्धा दिली होती, तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोक चव्हाण यांना आपण खेटत असल्याचेही वर्णन त्यांनी पुढील कार्यकर्त्यास सांगितले होते, सत्तेत राहून मोठ्या पदावर असलेल्या नेत्याला असे बोलणे हे भोकर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना  खटकले, त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाच्या फेसबुकवरून साहेबा ऐवजी आमच्यासोबत खेटून दाखवा, या आशयाची फेसबुक पोस्ट व्हायरल केल्यामुळे वादाची ठिणगी उडाली असल्याचे दिसून येत आहे. फेसबुक पोस्टवर कार्यकर्त्या कडून क्रिया व प्रतिक्रिया उमटत आहेत, आता ह्या व्हायरल रेकॉर्डिंग व फेसबुक पोष्टवर वरीष्ठ काय निर्णय घेतात, हे पहाणेच योग्य ठरेल. पण भोकर तालुक्यात बहुतांश कार्यकर्त्याकडे निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल रेकॉर्डिंग आणि फेसबुक पोस्ट असल्यामुळे सगळीकडे चर्चेचा विषय बनला असून, याचा येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला फायदा होईल व कोणत्या पक्षाला तोटा होईल हे येणारा काळच ठरवेल.