रमेश गंगासागरे
उत्तर प्रदेशात Aimim पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओवेसी यांच्यावर काल झालेल्या भ्याड हल्याचा भोकर मध्ये निषेध व्यक्त करून तहसीलदार यांच्या मार्फत भारताच्या गृहमंत्र्याना निवेदन पाठविण्यात आले.
उत्तर प्रदेशात निवडणुकीदरम्यान प्रचार करण्यासाठी जात असलेल्या ए.आय. एम. आय. एम. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी त्यांच्यावर एका टोलनाक्यावर काही समाजकंटकांनी गोळ्या झाडल्या, त्या हल्यात असदुद्दीन ओवेसी हे थोडक्यात बचावले, या हल्ल्याचा निषेध भोकर येथील एम. आय. एम. पक्षाच्यावतीने आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. निवेदन देण्यासाठी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून तहसील कार्यालय भोकर येथे आले गृहमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर ह्यापूर्वी सुद्धा भ्याड हल्ला झाला होता, त्यामुळे त्यांना झेड प्लस( Z- PLUS) सुरक्षा देण्यात यावी, तसेच हल्ल्यामागील गुन्हेगारांना तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी पाठविलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली असून निवेदनावर बाबा खान फारुख खान पठाण, जुनेद पटेल, निजाम बाबा, इर्शाद खान आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
0 Comments