रमेश गंगासागरे
भोकर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष दबंग पोलिस कर्मचारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे नामदेव जाधव हे आज सकाळी भोसी या गावाजवळ अपघातामध्ये जखमी झाले आहेत.
घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस कर्मचारी नामदेव जाधव ते नांदेड येथून भोकर कडे आपले कर्तव्य बजावण्यासाठी येत असताना, सकाळी 9 वाजताच्या दरम्यान भोसी ता. भोकर ईथे एका बैलाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात ते खाली पडून गंभीर जखमी झाले असून त्यांच्या 8 दातांना मोठी दुखापत झाली आहे. त्यातील 6 दात त्यांना कायमचे गमवावे लागले आहेत. सुदैवाने दैव बलवत्तर होते म्हणून त्यांचा जीव थोडक्यात वाचला. अपघात होताच अनेक नागरिकांनी त्यांची सहानुभूतीपूर्वक विचारना करून नातेवाईकांना व मित्रमंडळींना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले. भोकर येथील पटेल यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करून त्यांना नांदेड येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या उत्तम असून ते डॉक्टरांच्या निगराणीखाली असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. अपघाताचे वृत्त शहरात पसरताच त्यांचे मित्रमंडळी व हितचिंतकांनी त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी केली होती. तसेच अनेक हितचिंतकांनी फोन करून त्यांच्या प्रकृती विषयी विचारणा करत होते. अत्यंत संयमी, मितभाषी, अभ्यासू आणी कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून जाधव यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग भोकर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अशा कर्मचार्यांला दुखापत झाल्याने अनेक नागरिक, पत्रकार, वकील व सामाजिक कार्यकर्ते त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येत होते.
0 Comments