भोकर :(दि.26 जानेवारी)
रमेश गंगासागरे
मागील 91 दिवसांपासून एसटी कर्मचारी हे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत सदरील आंदोलनाकडे महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे आता हे कर्मचारी दुखवटा पाळत आहेत. त्या दुखवट्याचा आज 91 दिवस असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी भोकर बस स्थानका समोरून ते शिवाजी चौकापर्यंत भीक मांगो आंदोलन केले.
एस टी कर्मचाऱ्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने सदरील कर्मचारी आहे 91 दिवसापासून कामावर गेले नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचारी बांधवावर उपासमारीची वेळ आली असून सदरील कर्मचाऱ्यांना भोकर शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी किराणा मालाची किट तसेच अन्नधान्य काही प्रमाणामध्ये वाटप करून माणुसकीचे दर्शन दाखवले होते. अनेक कर्मचारी हे भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत. कर्मचाऱ्यांना घर भाडे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने घरमालक घरी रिकामे करण्यासाठी तगादा लावत असल्याचे अनेक कर्मचारी बोलून दाखवत आहेत. कर्मचाऱ्यांच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांचे खाजगी शिकवणी धारक शिक्षक सुद्धा पैशासाठी तगादा लावत असल्याने कर्मचाऱ्यांसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर झाली असल्याचे दिसून येत आहे. तर काही जणांची लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आज प्रजासत्ताकदिनी अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान अक्षरशः रोडवर भीक मागुण सरकारच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करून एसटी पूर्ववत चालू करावी अशी मागणी विद्यार्थी, पालक, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक करताना दिसून येत आहेत.
0 Comments