भोकर :(दि.9 जानेवारी)
रमेश गंगासागरे

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भोकर शहरातील किनवट रोडवरील शासकीय वसतिगृह सी.सी.सी. सेन्टर म्हणून अधिग्रहण करण्यासाठी भोकर तहसिलकडून नुकतीच पाहणी करण्यात आली.
       महाराष्ट्रामध्ये कोरोणा हा संसर्गजन्य रोग झपाट्याने सगळीकडे फोपावत आहे, प्रत्येक रुग्णालयांमध्ये कोरोनाचे पेशंट मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्री राजेश लांडगे हे तयारीला लागले असून त्यांनी नुकतीच भोकर शहरातील किनवट रोडवर असलेल्या मुला-मुलींच्या शासकीय वस्तीग्रहाची सीसीसी सेंटर म्हणून पाहणी केली आहे. पुढील काळात जर कोरोनाचे पेशंट वाढले तर त्यांना भोकर शहरातच सर्व सुविधा मिळाव्यात या उदात्त हेतूने भोकर मध्येच कोविड सेंटर तयार करण्यासाठी प्रशासन तयारीला लागल्याचे दिसून आले आहे.