भोकर :(दि.8 जानेवारी)
      रमेश गंगासागरे 

         तालुक्यातील बटाळा येथील एक तरून  बटाळा शिवारातील एका शेतकऱ्याच्या विहीरीमध्ये मृतावस्थेत आढळल्याने मयत तरुणाचे काका यांनी भोकर ठाण्याला दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
       आज दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी रमेश नरवाडे या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी मध्ये मयत शिवदास कोंडीबा कांबळे वय 28 वर्ष राहणार बटाळा यांचे प्रेत तरंगताना दिसून आले, त्यामुळे मयताचे काका श्री दत्ता रामा कांबळे यांनी भोकर ठाण्याला फिर्याद दिल्यावरून भोकर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. भोकर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेताची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे .घटनेचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल देवकांबळे हे करत आहेत.
       मयत शिवदास कांबळे यांचे मागील वर्षी लग्न झाले असून त्यांना एक छोटा मुलगा असल्याचे कळते. मयताच्या मरणाचे कारण अद्याप समजू शकले नाही.