भोकर :(दि.25 जानेवारी)
             रमेश गंगासागरे
     आज दिनांक 25 जानेवारी रोजी भोकर तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.यानिमित्त विविध शाळा,महाविद्यालयांत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.   त्यामध्ये लोकशाही आकाश कंदील स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र लिहून घेण्यात आले. त्याअनुषंगाने स्पर्धा आयोजित करून सहभाग नोंदविलेल्या शाळा-महाविद्यालयाचे मु.अ.प्राचार्य यांचा सन्मानपत्र देऊन व स्पर्धेतील विजेत्यांचा तहसीलदार साहेब यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच उत्कृष्ट BLO यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी तहसीलदार श्री.लांडगे यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व विशद करून भारतीय लोकशाही भक्कम करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील घटकांनी प्रयत्न करावेत व जागरूक मतदार म्हणून प्रत्येकाने मतदान प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे.असे आवाहन करून उपस्थितांना मतदारासाठीची प्रतिज्ञा वाचन करून घेतली.यावेळी श्री.सय्यद इस्माईल ना.तह. निवडणूक,श्रीमती रेखा चामनर ना.तह,श्री.दिलीप कावळे महसूल सहाय्यक,संजय सूर्यवंशी ऑपरेटर,गोरशेटवार सर,कोतवाल,शिपाई व सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सय्यद इस्माईल नायब तहसीलदार यांनी केले तर उत्कृष्ट सूत्र संचलन व आभार प्रदर्शन श्री.मिलिंद जाधव यांनी केले.