रमेश गंगासागरे
आजच्या तरुण पत्रकारांनी आपली लेखणी समाज हितासाठी चालवून समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन भोकरचे तहसीलदार श्री, राजेश लांडगे यांनी दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सोहळ्यामध्ये केले. आज दर्पण दिनानिमित्त भोकर शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने, भोकर पोलीस स्टेशनच्या वतीने, वर्ल्ड व्हिजन संस्था आणि रेणुकामाता मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने पत्रकार भोकर येथील पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
06 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे नियतकालिक सुरु केले होते त्या नियतकालिकाचा आज वर्धापन दिन असल्याकारणाने संबंध भारतभर सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो आज सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह भोकर येथे पत्रकारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार राजेश लांडगे हे होते प्रमुख पाहुणे भोकर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांची उपस्थिती होती सत्कारप्रसंगी पुढे बोलतांना राजेश लांडगे म्हणाले की जुन्या काळातील पत्रकारिता आणि नवीन विज्ञान युगातील पत्रकारितेमध्ये खूप मोठा फरक दिसून येत आहे. आज दिल्लीची बातमी गल्लीपर्यंत येण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी लागत आहे. तर जुन्या काळामध्ये एखादी बातमी छापून येण्यासाठी पाच दिवसाचा कालावधी जात होता. आज काळानुसार पत्रकारांच्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढलेल्या आहेत. त्यामुळे आजची पत्रकारिता ही म्हणावी तेवढी सोपी नसून पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून लेखणी समाजहितासाठी वापरून समाजाचे भले करावे, असे ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेवराव आयलवाड, कै. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, उपसभापती गणेश राठोड, माजी नगरसेवक भगवानराव दंडवे, बेंबरचे माजी सरपंच मुंगल साहेब, संचालक रामचंद्र मुसळे काजू भाई इनामदार यांच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मनोज गिमेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक तथा पत्रकार रामचंद्र मुसळे यांनी केले.
वर्ल्ड व्हिजन संस्थेच्यावतीने श्याम बाबू, शिरीष कांबळे यांनी पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार करून भेटवस्तू दिली. तसेच चौथ्या कार्यक्रमात रेणुकामाता मल्टी स्टेट बँकेच्या वतीने सुद्धा पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संपादक श्री, रमेश गंगासागरेसह शहरातील सर्व संपादक, व पत्रकारांची उपस्थिती होती.
0 Comments