भोकर :(दि.5 जानेवारी)
     रमेश गंगासागरे

तालुक्यातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस म्हणून भोकर येथील पोस्ट ऑफिस कडे पाहिले जाते, ह्या पोस्ट ऑफिस मधून नियमितपणे नागरिकांचे विविध कामे  असल्याने सध्या नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देताना दिसून येत आहेत. आज दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सदरील पोस्ट ऑफिसला भेट दिली असता पोस्ट ऑफिसच्या आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात केरकचरा व घाण पसरलेली दिसून आली.
       सध्या कोरोना काळ चालू असल्यामुळे पोस्टातील कर्मचाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वच्छता ठेवावी किंवा एक दिवस श्रमदान करून स्वच्छता अभियान राबवावे असे सुजाण नागरिक बोलत आहेत. आजूबाजूचे नागरिक पोस्ट ऑफिसच्या आवारामध्ये झाडझूड केलेला कचरा आणून टाकत असल्याचेही यावेळी निदर्शनास आले आहे. अशा नागरिकांना पोस्टातील कर्मचाऱ्यानी वेळीच पायबंद घालावा किंवा पोस्ट ऑफिसच्या आवारात कचरा आणून टाकणाऱ्या नागरिकावर कायदेशीर कार्यवाही करून हा परिसर स्वच्छ ठेवावा असे बोलले जात आहे.