भोकर :(दि.4जानेवारी)
रमेश गंगासागरे
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी भोकर विभागीय कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली असून या कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी एस.व्ही.पिंपरे यांची, तर उपाध्यक्षपदी गणेश दुधकावडे, साईनाथ कल्याणकर, बी.सी.शिंदे आणि सचिवपदी अरविंद सावते यांची निवड करण्यात आली असून उर्वरीत कार्यकारिणी पुढील प्रमाने आहे.
केंद्रीय उपाध्यक्ष श्री. सिद्धार्थ पाटील यांच्या आदेशानुसार भोकर विभागाची नवीन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. एस.व्ही. पिंपरे यांच्या अध्यक्षते खालील एका बैठकीत सदरील निवड करण्यात आली असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन रणवीर, अविनाश खंदारे, राम भोंगळे, राजेश मिरगेवाड यांची उपस्थित होती. संघटक राम भोंगाळे,सहसचिव ए.ए.चव्हाण, कोषध्यक्ष एन.जे. कावळे, प्रसिद्धी प्रमुख, एस.एस.फोले, सल्लागार, डी. एस. पवार, सदस्य नागेश पट्टपेवाड, सुखदेव डोंगरे, पवन कनाके, बलभीम खांडेकर, अतुल तिव्हाळे, साईनाथ राचरवाड तर महिला प्रतिनिधी म्हणून रुखसांना अ.करीम, श्रीमती, पी. पी. स्थूल मॅडम यांची निवड करण्यात आली. कार्यकर्मास मोठया प्रमाणात सभासद उपस्थित होते. निवड झालेल्या सर्वांचे निवडी बद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून पुष्पहार देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments