भोकर :(दि.12जानेवारी)
रमेश गंगासागरे
तालुक्यातील मौ. लामकानी व मौ. बेंबर येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुंटूबा श्रीमती रोहीणी गंगाधर पवार व श्रीमती शोभाबाई बापुराव चिट्टे यांना मा. जिल्हाधिकारी नांदेड डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते प्रत्येकी 1 लक्ष रूपयाचा मदतीचा धनादेश तहसिल कार्यलय भोकर येथे वाटप करण्यात आले.
मौ. लामकाणी ता. भोकर येथील शेतकरी नामे गंगाधर धोंडिबा पवार यांनी दि. 27/08/2021 रोजी थकीत कर्ज नापीकीला कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. व मौ. बेंबर ता. भोकर येथील शेतकरी नामे बापुराव पुंजाजी चिट्टे यांनी दि. 22/11 /2021 रोजी थकीत कर्ज नापीकीला कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शासन निर्णय महसुल व वनविभाग क्रं. एससीवाय-1205/प्रक्रं-189/म-7 दि. 23/01/2006 नुसार कर्ज व नापीकी ला कंटाळुन केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुंटूबातील वारसांना 1 लाख रूपयाची मदत देण्यात येते. करीता मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने सदरील प्रकरण पात्र ठरविण्यात येऊन रक्कम मंजुर केली होती. उपविभागीय आधिकारी भोकर श्री राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार भोकर श्री राजेश लांडगे, ना. तहसिलदार श्री संजय सोलंकर साहेब, अ.का. श्री मिलींद टोम्पे, म.सा. श्री साहेबराव अशोकराव भालेराव यांनी नैसर्गीक आपत्ती विभाग तहसिल कार्यालय भोकर अंतर्गत सदरील कामकाज पाहिले. मदत मिळाल्याने वारसांच्या चेहऱ्यावर आज थोडासा आनंद दिसून आला.
0 Comments