नांदेड: (दि.30 जानेवारी) 
    रमेश गंगासागरे
सुप्रसिद्धगझलकार इलाही जमादार यांच्या प्रथम स्मृतीदिना प्रित्यर्थ येत्या ३१ जानेवारी रोजी सोमवारी नांदेड येथे कोहिनूर-ए-गज़ल इलाही जमादार गजलांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
       येथील नागोरावजी नरवाडे मंगल कार्यालयात दुपारी ४ वाजता होणाऱ्या गजलांजली अभिवादन कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्रालयातील अवर सचिव विकास तु. कदम यांच्या हस्ते होणार आहे. प्रोफेसर डॉ. राजेंद्र गोणारकर, समाजकल्याण अधिकारी ग़ज़लकार बापू दासरी, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ऑनलाइन दूरदृश्य प्रणालीद्वारे हा कार्यक्रम सादर होणार आहे.
       जागृती सामाजिक प्रतिष्ठान आणि पूज्य मातोश्री स्मृतीशेष सीताबाई तुळशीराम कदम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुजलांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गजलांजली कार्यक्रम आकाशवाणीचे निवृत्त सहसंचालक स्मृतीशेष भीमराव शेळके विचार मंचावर होणार आहे, अशी माहिती इलाही जमादार अभिवादन कार्यक्रमाच्या संयोजन समितीतर्फे देण्यात आली आहे. नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी
पत्रकारिता महाविद्यालयात प्रसिद्ध विचारवंत प्रोफेसर डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या अध्यक्षतेखाली इलाही जमादार अभिवादन कार्यक्रमाच्या आयोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत कविश्रेष्ठ इलाही जमादार यांच्या प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. सध्याची कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आणि शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करूनं संयोजन समिती संगीत क्षेत्रामधील मोजके वाद्यवृंद, कलावंत गायक आणि मर्यादित रसिकांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ग़ज़लांजली कार्यक्रमात इलाही जमादार यांच्या ग़ज़ल, दोहे, लावणी गायक सादर करणार आहेत. त्यामध्य प्रसिद्ध गायक नाम दो व इंगळे, बी.के. कांबळे, शीव मठपती, महेश जैन, प्रा. किरण सावंत, संगीतकार सदाशिव गच्चे, आकांक्षा मोतेवार, रागेश्री जोशी, राजकिरण कांबळे गायक सहभागी होणार आहेत. सुप्रसिद्ध तबलावादक स्वप्नील धुळे, अंकुश डाखोरे, आदित्य डावरे, अमित गायकवाड, ओंकार गायकवाड आणि त्यांचा संगीत संच या कार्यक्रमात वाद्यवृंदासह साथ-संगत देणार आहे.