भोकर :(दि.28 जानेवारी)
    रमेश गंगासागरे
       काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे, संतोष नागरगोजे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार हे भोकर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांना भोकर तालुक्याचा कार्य अहवाल तालुका व शहराध्यक्ष यांच्यावतीने सादर करण्यात आला होता, या कार्य अहवालावर वरिष्ठ नेते जाम खुष झाले असून त्यांनी तालुका व शहराध्यक्ष या दोघांच्या कार्यावर समाधान व्यक्त केले आहे.
       भोकर नगरपरिषदेच्या आगामी निवडणूकी संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रणशिंग फुंकण्यात आले असून मागील एका वर्षाच्या कालावधीत  भोकर तालुक्यात संघटन मजबूत करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर व तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती. या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी भोकर वर लक्ष केंद्रित केले असून आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीवर मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी हा पक्ष सज्ज झाला आहे.
       भोकर तालुका जनसंपर्क कार्यलय येथे पदाधिकारी वर्गाची बैठक घेऊन कार्यकर्त्याना सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी तालुका अध्यक्ष यांनी भोकर तालुक्याचा कार्यअहवाल सादर केला. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी भोकर शहर संपर्क कार्यालयास भेट दिली, या वेळी त्यांचा  शहराध्यक्ष श्री, आकाश गेंटेवार यांच्या वतीने त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. तसेच शहराध्यक्ष आकाश गेंटेवार यांचा कार्यअहवाल यावेळी सादर करण्यात आला. तेव्हा वरीष्ठ नेत्यांनी या कार्य अहवालावर समाधान व्यक्त करून आगामी भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीची जोरदार तयारी करण्याची सूचना त्यांनी यावेळी शहराध्यक्ष यांना केली. या बैठकीला शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.