भोकर :(दि.27 जानेवारी)
रमेश गंगासागरे
प्रशासन आपल्या गावी या उपक्रमाअंतर्गत २६ जानेवारी रोजी दुपारी जि.प. शाळा नागापूर येथे गावातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना उपविभागीय अधिकारी श्री, राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
ध्वजारोहण झाल्या नंतर दुपारी गावात प्रमाणपत्र वाटप आणि वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राजेंद्र खंदारे साहेब, तहसीलदार लांडगे साहेब, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, गावातील प्रमुख मंडळी शिक्षक, मोहन गुरमे, साबळे सर, देशमुख मॅडम, विशेष सहकार्य विठ्ठल आक्कलवाड, साईनाथ दासरवाड सरपंच डि.एस. व्यवहारे, उपसरपंच बालाजी पाटील शानमवाड, चेअरमन रुखमाजी पा. बेरदेवाड, पोलीस पाटील बालाजी शानमवाड, गोविंद गुजेवाड, दिगांबर पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, बाबाराव बेरदेवाड शालेय समिती अध्यक्ष, गोविंद गुजेवाड, ग्राम पंचायत सर्व सदस्य, से.स. सोसायटीचे सर्व सदस्य, माजी पोलिस पाटील गंगाधरराव शानमवाड, गोविंद गुजेवाड, मारोतराव बेरदेवाड, व ईतर अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
0 Comments