नायगांव :(24 जानेवारी)
रमेश जी.गंगासागरे
गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती मंडळ नरसी कार्यकारीणी अध्यक्षपदी येथील जेष्ठ पत्रकार गंगाधर गंगासागरे यांची सर्वानुमते तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली.
क्रांतीकारी महामानव विज्ञानवादी विचारवंत जगतगुरु गुरु रविदास महाराज यांची ६२४ वी जयंती नरसी (ता.नायगांव ) येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रविवार या दिवासी साजरी करण्यात येणार आहे . त्या अनुषंगाने काल दिनांक २३ रोजी येथील समाजबांधवांची महत्वपुर्ण बैठक घेण्यात येवून पुढीलप्रमाणे कार्यकारीणी जाहीर करण्यात आली यात अध्यक्षपदी गंगाधर गंगासागरे (पत्रकार) , सचिव हणमंत दिगांबर गंगासागरे , सहसचिव आनंदा बरबडे , उपाध्यक्ष संतोष कांबळे , बालाजी बरबडे , कार्याध्यक्ष धोंडीबा कांबळे , माधव गंगासागरे , कोषाध्यक्ष गंगाधर (मिस्तरी) दुडकीकर , संघटक भारत गंगासागरे , व्यंकट गंगासागरे , सदस्यपदी बाबू गंगासागरे , ज्ञानेश्वर गंगासागरे , भास्कर गंगासागरे , सोमनाथ कांबळे , चंद्रकलाबाई आनंदराव गंगासागरे , अशोक गंगासागरे , शशिकलाबाई धोंडीबा कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे .
सदरील महत्वपुर्ण बैठक जमनाजी गंगाराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून यावेळी माधव गंंगासागरे समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थीती होती .
0 Comments