भोकर :(दि.23 जानेवारी)
        प्रतिनिधी

तमाम आदिवासी कोळी बांधवांच्या प्रलंबित न्याय हक्काच्या मागण्यांसाठी तसेच चालू घडामोडी वर चर्चा करण्यासाठी मुंबई येथील भारतीय आदिवासी कोळी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री भिमराव कोळी हे उपस्थित राहणार असून त्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भोकर येथे समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयोजक भारतीय आदिवासी कोळी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयकुमार मोरे कोळी यांनी दिली आहे.
       मागील अनेक वर्षापासून मूळ आदिवासी बांधवावर बाहेरच्या आदिवासी यांनी अतिक्रमण केले असून मूळ अधिवासी याना अनेक शासकीय योजनेपासून दूर ठेवल्या जात आहे. आदिवासी मध्ये होणारे घुसखोरी हाणून पाडण्यासाठी आदिवासी बांधवांची एकजूट होणे गरजेचे आहे. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री भिमराव कोळी हे शासकीय विश्रामगृह भोकर येथे उपस्थित राहणार असून भोकर तालुक्यातील तमाम आदिवासी बांधवांनी 26 जानेवारी रोजी 11 वाजता शासकीय विश्रामगृह भोकर येथे बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन विजयकुमार मोरे यांनी केले आहे.