भोकर :(दि.2 जानेवारी)
    रमेश गंगासागरे

   अखिल भारतीय छावा संघटन भोकरचे उपाध्यक्ष माधव पाटील सुर्यवंशी बोरगावकर यांचे सामाजिक कार्य मोठे असून ते गावातील अनेक नागरिकांच्या मदतीला संकटकाळात धावून जातात, शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी त्यांनी मागील वर्षी संघटने मार्फत निकराचा लढा देऊन आंदोलन यशस्वी केले होते, त्यांच्या आंदोलनाची बँकेने दखल घेऊन  तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बँकेने तात्काळ कर्ज ही वाटप केले होते,  आज 2 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना मी आभाळभर शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले आहे.
       आज सकाळी बोरगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले, तर दुपारी भोकर येथील सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले, त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमास बोरगाव येथील सरपंच प्रतिनिधी श्री संतोष गागदे, उपसरपंच श्री दत्तात्रेय दासरवाड, गितेश बोटलेवाड, सुभाष पुरी, लाला हुबेवाड, छावाचे जिल्हा संपर्क प्रमुख श्री शंकर पाटील जाधव, दिलीप रायभोळे, छावाचे तालुका अध्यक्ष श्री, सावळे पाटील, उमेश पुरी, बालाजी मुपरवाड, रंगराव पाटील, सोहम शेट्ये, सुभाष नाईक, श्रीधर सूर्यवंशी, भगवान जाधव, दशरथ कोंडावार, दत्ता पाटील जाधव, गजानन तवर संपादक, रमेश गंगासागरे, विजय मोरे, अहेमद करखेलीकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.