भोकर :(दि.19 जानेवारी)
रमेश गंगासागरे

भोकर तालुक्यात चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफिया वर पाळत ठेवून उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र खंदारे यांनी धडक कारवाई करत असल्याने वाळू चोराचे धाबे दणाणले आहे
       मागील तीन महिन्यांमध्ये भोकर तालुका व परिसरामध्ये अवैधरित्या वाळू उपसा करून चढ्या दराने वाळूची विक्री होत होती यावर आळा घालण्यासाठी अनेक वर्तमानपत्रातून व सोशल मीडियावरील अनेक पोर्टल मधून बातम्या प्रकाशित होताच भोकर चे उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र खंदारे यांनी अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या व विक्री करणाऱ्या वाळू बहाद्दरावर दंडात्मक कारवाई करत असल्याने वाळू माफियांचे तालुक्यात धाबे दणाणले चे दिसत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी पकडून कारवाई केलेली वाहने अशी वाहन क्रमांक MH 04 FP 3289 दंड रुपये 241750/-, वाहन क्रमांक MH 26 BC 3419 दंड रुपये120875/- वाहन क्रमांक MH 46 AP 2265 हे वाहन पहिल्यांदा दंड भरून गेल्यावर परत दुसऱ्यादा वाळू चोरी करताना सापडल्यामुळे यावर मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे अशा पद्धतीने धडक कारवाया करून मोठा दंड लावल्या जात  असल्यामुळे वाळूमाफिया सध्या हैराण झाले असून रात्रीला वाळू चोरीच्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. वाळू चोर हे रात्रीस मुदखेड आणि उमरी रोड वरून शहरामध्ये येत असल्याचे अनेक जण बोलत आहेत त्यामुळे सदरील रस्त्यावर रात्रीला दस्त लावण्याची मागणी वाढली आहे.